Ad will apear here
Next
‘स्वरसागरात’ रसिक डुंबले

पिंपरी चिंचवड :  पखवाज आणि तबल्याचा आसमंतामध्ये भरुन राहिलेला दमदार सूर, त्याला लालित्यपूर्ण नृत्याची साथ आणि या संपूर्ण संरचनेचे मर्म उलगडून सांगणारे तालयोगी असा बहारदार त्रिवेणी संगम ‘तालयात्रे’च्या निमित्ताने रसिकांनी अनुभवला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या ‘स्वरसागर महोत्सवा’त तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी पंचवीस सहकलाकारांसह सादर केलेल्या बहारदार ‘तालयात्रे’त रसिक तल्लीन झाले. 
 'तालायात्रा' सादर करताना पं. सुरेश तळवलकर
पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरूवारपासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला. शुक्रवारी ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी त्यांच्या संकल्पनेवर आधारित ‘तालयात्रा’ हा एक अनोखा कार्यक्रम सादर केला. यात त्यांच्यासह विविध वादक व नर्तक असे एकूण पंचवीस कलाकार सहभागी झाले होते. 

ताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम असलेल्या या बहारदार प्रस्तुतीची सुरूवात राग हंसध्वनी, ताल धमारातील गणेशस्तुतीने झाली. शिवपरण, गणेशपरण यांचा अद्भुत संगम असलेले पखवाज आणि कथ्थक नृत्यातील तोडे, परण यांनी सजलेले हे वादन व नर्तन रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले. 
 
त्यानंतर झपतालातील बिंदादीन महाराजांची ‘शाम छबी अति बध’ ही विख्यात रचना सादर करण्यात आली. यातील लयकारी अवघड असते पण क्लिष्ट नाही, असे याचे वैशिष्ट्य या वेळी सुरेशजींनी समजावून सांगितले. राग सोहनीमधील आडाचौतालातील गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांनी रचलेली ‘चलो हटो पिया अब निक ना आओ’ ही अष्टनायिकांपैकी खंडिता ही नायिका प्रस्तुत करणारी देखणी रचना सादर केली. या तालयात्रेचा समारोप ‘आज बस गयी शामजीकी सुरतीया’ या सुंदर रचनेने झाला.   
 
या बहारदार तालयात्रेमध्ये दमदार मृदंग वादन गोविंद भिलारे, ओंकार दळवी, सुजीत लोहोरे, भागवत चव्हाण यांनी केले तर, समर्पक तबलासाथ आशय कुलकर्णी, ईशान परांजपे व सुरेशजींची कन्या आणि शिष्या सावनी तळवलकर - गाडगीळ यांनी केली. 

टाळाची साथ तेजस माजगावकर, केजॉनची साथ उमेश वारभुवन, कलाबाशची साथ  ऋतुराज हिंगे यांनी तर, ड्रम्सची साथ अभिषेक भुरुक यांनी केली. सतार साथ अनिरुद्ध जोशी यांनी व सिंथेसायझर साथ अनय गाडगीळ आणि संवादिनीची अभिषेक शिनकर यांनी केली.

बहारदार गायन विनय रामदासन, नागेश आडगावकर यांनी केले. या नृत्य, वादन व गायन मैफिलीत नृत्यकलाकार अस्मिता ठाकूर, शीतल काळगे, अमृता गोगटे, आयुषी दीक्षित, रजत पवार, गौरी स्वकुळ यांनी लालित्यपूर्ण कथ्थक नृत्ये सादर केली.

 स्वरसागर महोत्सवातील शुक्रवारच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ बासरीबादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य व पुतणे राकेश चौरसिया यांचे सुमधूर बासरीवादन झाले. त्यांनी राग जोगमधील बंदिश या वेळी सादर केली. सुरांशी लीलया खेळत त्यांचे समेवर येणे, वादनातील तयारी पेश करत तबलाच्या साथीने वादन करणे रसिकांना मोहवून गेले. कृष्णाच्या लडिवाळ बासरीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर त्यांनी आसमंतात भरुन टाकले होते. बासरी वादनाचा शेवट एका पहाडी सुरावटीने केला. कधी संपूच नये असे वाटणाऱ्या या बासरीवादनाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात  दाद दिली. राकेशजींना तबल्याची दमदार आणि जोशपूर्ण साथ पं. कालिनाथ मिश्रा यांनी केली. 
 
या वेळी एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, नगरसेविका अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, संयोजक व सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 


(स्वरसागर महोत्सवात सादर झालेल्या तालायात्रा कार्यक्रमाचा व्हिडीओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZXXBL
Similar Posts
गायन, वादन आणि नृत्यकलेने रंगणार ‘तालयात्रा’ पुणे : तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या तालयोगी आश्रमाच्या आठव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने गायन, वादन व नृत्य या तीनही कलांना जोडणाऱ्या ‘तालयात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सोमवारी, आठ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य गायन, वादन व नृत्याचे सादरीकरण करणार आहेत
नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर,मॅरेथान स्पर्धा व वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे १००० आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता
पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृह पिंपरी-चिंचवड :  स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी कासारवाडी येथे स्मार्ट स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा अभाव होता.भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याची मागणी लावून धरली होती. त्याला यश येऊन
गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन भोसरी :  दहावी, बारावीत उत्तम गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. दहावीत ८० ते ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये, नव्वद टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language